कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात लिंगेश्वर माध्यमिक विद्यालय तुळसुली तर प्राथमिक गटात शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव ने प्रतिकृती मांडणी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असुन जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात कुडाळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
५३ वे कुडाळ तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शन साळगाव येथील जयहिंद ग्रामोन्नती संस्थेच्या प्रमोद रविंद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात संपन्न झाले. बक्षिस वितरण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मयुर शारबीद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी विभाग प्रमुख ऋषीकेश जाधव, कुडाळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा वसोली विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित परब, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. स्वप्नाली वारंग, केंद्र प्रमुख गोविंद चव्हाण,चंद्रकांत तांबे, महेश परूळेकर, विषय शिक्षिका ममता पालकर, पतपेढी उपाध्यक्ष गिरीश गोसावी, शिक्षक भारतीचे प्रतिनिधी सुशीलकुमार कडुलकर, पणदूर विद्यालयाचे शिक्षक कर्पे, आदी मान्यवर उपस्थित होते.
माध्यमिक प्रतिकृती – द्वितीय क्रमांक श्री देवी माऊली विद्यालय चेंदवन, तृतीय बॅ नाथ पै विद्यालय कुडाळ, उत्तेजनार्थ शिवाजी ईंग्लिश स्कूल पणदूर तिठा.
प्राथमिक प्रतिकृती – द्वितीय एस .एल .देसाई विद्यालय पाट, तृतीय जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पिंगुळी नं१, उत्तेजनार्थ कुडाळ हाय. कुडाळ.
प्राथमिक दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती – प्रथम लिंगेश्वर विद्यालय तुळसुली द्वितीय शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा तृतीय आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली.
माध्यमिक दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती – प्रथम शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा द्वितीय श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण तृतीय आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली उत्तेजनार्थ लिंगेश्वर विद्यालय तुळसुली.
माध्यमिक गट प्रयोगशाळा परिचर प्रतिकृती – प्रथम कुडाळ हायस्कूल कुडाळ द्वितीय लिंगेश्वर विद्यालय तुळसुली तृतीय न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरुर.
प्राथमिक गट शैक्षणिक साहित्य ( शिक्षक ) – प्रथम अस्मा अख्तर मियाॅ शेख पिंगुळी गोंधयाळे उर्दू शाळा
द्वितीय भालचंद्र सुहास आजगावकर झाराप कामळेवीर शाळा तृतीय सुशीलकुमार पांडुरंग कडूलकर कुडाळ हायस्कूल कुडाळ
माध्यमिक गट शैक्षणिक साहित्य – ( शिक्षक ) प्रथम प्रज्ञा अभिमन्यू आजगावकर न्यू इंग्लिश स्कूल कसाल द्वितीय कनक कौशल कुरतडकर लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे तृतीय अतुल बागवे कुडाळ हायस्कूल कुडाळ.
प्रश्नमंजुषा प्राथमिक गट – प्रथम सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ द्वितीय शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव तृतीय कुडाळ हायस्कूल कुडाळ.
प्रश्नमंजुषा माध्यमिक गट – प्रथम श्री वा. स. विद्यालय माणगाव द्वितीय दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तृतीय कुडाळ हायस्कूल कुडाळ.
निबंध स्पर्धा माध्यमिक – प्रथम पर्णिका हनुमंत नाईक कुडाळ हायस्कूल कुडाळ द्वितीय वेदिका विनोद परब न्यू इंग्लिश स्कूल कसाल तृतीय सेजल शरद माणगावकर शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव .
निबंध स्पर्धा प्राथमिक – प्रथम नेहा कृष्णा लाड डिगस माध्यमिक विद्यालय द्वितीय तमन्ना संजय भोई केरवडे तर्फ माणगाव शाळा तृतीय शौर्या सुनील वारंग कुडाळ हायस्कूल कुडाळ.
वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक – गट प्रथम वरदा विनायक जोशी लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे द्वितीय रिया मंगेश धुरी बै. नाथ पै विद्यालय कुडाळ तृतीय लेखा केशव सरवटे न्यू इंग्लिश स्कूल कसाल.
वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक – प्रथम प्रांजल सतीश तेरसे द्वितीय आर्य दिनानाथ माणगावकर तृतीय कस्तुरी सचिन बाणे.
यावेळी अध्यापक महाविद्यालयात संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानंद पिळणकर यांनी केले स्वागत प्राचार्य शारबीद्रे यांनी केले ,आभार प्राध्यापक अवधूत वेजरे यांनी मानले.जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी सावंतवाडी येथील मिलाग्रिस हायस्कूल येथे होणार आहे.









