ठळक घडामोडी

पिंगुळीत अपघात; एक गंभीर जखमी

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात

पादचारी व्यक्तीला चारचाकी वाहनाची धडक

कुडाळ : प्रतिनिधी
      मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला आहे. हा अपघात आज सात वाजताच्या सुमारास झाला.
      मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर परिसरात हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना एका व्यक्तीला सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने येणा-या एका चारचाकीची धडक बसली. या धडकेत पादचारी व्यक्ती जखमी झाली आहे. जखमीला तातडीने कुडाळ येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

error: Content is protected !!