ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी दादा साईल बिनविरोध!

पणदूर गावात ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक; कार्यकर्त्यांचा जल्लोष

कुडाळ : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पणदूर गावात ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी गुलाल उधळत उत्स्फूर्त जल्लोष केला.
     निवडीनंतर नवनिर्वाचित उपाध्यक्ष दादा साईल यांनी पणदूर गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री सातेरी देवी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या वेळी ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी दादा साईल यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या निवासस्थानी देखील अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

error: Content is protected !!