आत्महत्या की घातपात? पोलिस तपास वेगात
फॉरन्सीक पथक यांच्याकडून घटनास्थळ आणि मृतदेहाची तपासणी
मालवण : महेश कदम
मालवण तालुक्यातील कालावल येथे मंगळवारी कालावल पुलाखाली खाडी पात्रात वायंगणी- दुखंडेवाडी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे (वय 28) या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. बेपत्ता असल्याची नोंद आचरा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली होती. स्थानिक ग्रामस्थ सकाळी फिरायला आले असता. त्यांनी सहज पुलावरूण खाली पाहिले असता पुलाखाली मृतदेह झाडीत दिसून आल्यानंतर त्यांनी यांची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. कालावल पुलाखाली मृतदेह मिळाल्याची माहिती कळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह बेपत्ता अंतरा दुखंडे हिचा असल्याचे पाहून तिचे पती व नातेवाईकांनी तेथे टाहो फोडला. मृतदेह हा कालावल पुलाखालील पाणी नसलेल्या ओलसर भागात झाडीमध्ये अडकून असल्याचे दिसत होते. दरम्यान फॉरन्सीक पथक यांच्याकडून घटनास्थळ आणि मृतदेहाची तपासणी करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे, अशी माहीती आचरा पोलिसांकडून देण्यात आली.
सदर घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक सचिन माने व सुशांत पवार, हडी सरपंच प्रकाश तोडवळकर, पोलीस पाटील जानवी पांजरी, अशीता राणे दाखल झाले होत्या. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. ही घटना आत्महत्या, अपघात की घातपात याबाबत स्पष्टता येण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
अंतरा रविवार पासून बेपत्ता!
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वायंगणी दुखंडेवाडी येथील अंतरा हर्षद दुखंडे, वय 28 ही महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचे पती हर्षद दुखंडे यांनी आचरा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की माझी पत्नी ही आचरा येथील खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. शनिवारी नेहमीची कामे आटपून आम्ही रात्री झोपलो असताना रविवारी पहाटेच्या दरम्यान घराच्या मागचे दरवाज्याच्या कडीचा आवाज आल्याने जागा झालो त्यावेळी माझ्या बाजूला असलेली पत्नी जागेवर नव्हती म्हणून मी मागच्या दरवाज्याकडे गेलो असता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दरवाज्याला बाहेरुन कडी लावल्याने दरवाजा उघडेना त्यामुळे मी दरवाज्याच्या बाजुला असलेल्या खिडकितुन मोबाईलची बॅटरी मारुन पाहिली असता मला माझी पत्नी अंतरा ही रात्री घातलेल्या गाउनवर हातात बॅग घेवुन जाताना दिसली. म्हणुन मी घरातील बॅटरी घेवुन आमच्या घराच्या समोरील दरवाज्याने बाहेर जावून पाहिले असता माझी पत्नी मला दिसुन आली नाही परंतु त्याच दिशेने गाडीचा आवाज आला होता. त्यानंतर मी माझी गाडी घेवुन तिचा हडी, चिंदर पेट्रोलपंप याठिकाणी शोध घेतला परंतु ती काही मिळून आली नाही म्हणुन मी माझी मुंबई येथे राहाणारी सासु हिला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मी सकाळी १०.०० वा चे मानाने माझ्या पत्नीच्या मैत्रिणी व आमच्या नातेवाईकांकडे, खाडी किनारी शोध घेतला, परंतु ती काही मिळून आली नाही. 23 रोजी माझी पत्नी अंतरा हिचा एम.कॉम चा देवगड कॉलेजला पेपर होता तिथे गेली असल्याच्या शकत्येने मी दुपारी देवगड कॉलेजला जावुन माझी पत्नी पेपरला आली की नाही याची शिक्षकांकडे चौकशी केली असता ती पेपरला आली नसले बाबत सांगितले. त्यामुळे ती नापत्ता झाल्याची माझी खात्री झाली. शेवटी आचरा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.दरम्यान या घटनेमुळे या भागात हळहळ व्यक्त होत आहे. अंतरा हिच्या पश्चात पती, अडीज वर्षाची मुलगी, सासू सासरे चुलत नातेवाईक असा परिवार आहे.









