ठळक घडामोडी

नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवणच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी!

मालवण : प्रतिनिधी
     मुंबई-ठाणे येथे पार पडलेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवण येथील सौ. श्वेता पंकज पेडणेकर यांच्या ज्ञानदा अॅक्टिव्हिटी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.
     या स्पर्धेत नित्यानंद मयूर मुरकर याने ‘बी’ गटातून भारतात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णयश मिळवले. श्रीनिका निखील नागवेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. भूमी भूषण चव्हाण हिने चौथा क्रमांक मिळवला. ‘ए’ गटातून हर्षाली चव्हाण व योजना वराडकर यांनी चौथा क्रमांक संपादन केला. ‘डी’ गटातून पार्थ नंदकिशोर चव्हाण याने चौथा क्रमांक मिळवला, तर ‘टी’ गटातून प्रिशा थोरात हिनेही चौथा क्रमांक पटकावला. तसेच सावंतवाडी येथे झालेल्या पहिल्या फेरीत बुर्वांश आळवे, युवराज साळसकर, युक्ता मेस्त्री, रिया पाटील, चार्वी टेंबुलकर व विघ्नेश माणगांवकर यांनी ‘रिजनल अचिव्हर्स’ ट्रॉफी मिळवून उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शिका सौ. श्वेता पंकज पेडणेकर यांचे मालवणवासीयांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!