शोधासाठी नागरिकांना आवाहन
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील 75 वर्षीय चंद्रकांत बाबूराव लिंगवत हे बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले असून त्यानंतर ते परत आलेले नाहीत. त्यामुळे कुटुंबियामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रकांत लिंगवत यांच्या अंगावर घरातून निघताना पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि खाकी रंगाची हाफ पँट होती. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात शोध घेतला, मात्र त्यांचा अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही.तरी या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया – (बाबूराव लिंगवत-9930127256), (संतोष लिंगवत-9322430647) यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.









