मालवण प्रतिनिधी
नांदरुख साळकुंभा(गावडेवाडी) येथे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमीत्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची पूजा, सायंकाळी ५ वाजल्यापासून तीर्थप्रसाद व महाप्रसाद,सायंकाळी ६ वाजता लहान मुलांचे विविध कार्यक्रम, रात्रौ ठीक ८ वाजता श्री. समर्थ समई नृत्य ग्रुप खुडी तालुका देवगड यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या उत्सवाला शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त गावडे परिवार करमळीवाडी गावडेवाडी ग्रामस्थ तसेच साळकुंभा-घुमडे मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात येत आहे.









