ठळक घडामोडी

कुडाळ शहरात भरधाव कारचा थरार; दुचाकीसह उभ्या कारला धडक!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भररस्त्यात गोल फिरली; पादचाऱ्यांची पळापळ


सुदैवाने जीवितहानी टळली; पोस्ट ऑफिस चौकातील घटना

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने चांगलाच थरार उडविला. सदर कारने मुख्य रस्त्यावर गोल फिरत रस्त्यावरील दुचाकीला ठोकर दिली. त्यानंतर उभी असलेल्या दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरातील पादचारी नागरिक तसेच विक्रेत्यांमध्ये एकच पळापळ उडाली. या चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ असते. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

error: Content is protected !!