ठळक घडामोडी

माणगाव खोऱ्यातील दुर्दैवी घटना; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!

कुडाळ : प्रतिनिधी
           कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी विराली विठ्ठल रेमुळकर (वय १६) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आणि सावंतवाडी येथील बाल न्यायालयासमोर हजर केले. बाल न्यायालयाने त्याला ओरोस येथील बाल सुधार गृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहीती कुडाळ पोलीसांकडून देण्यात आली.
       कु. विराली विठ्ठल रेमुळकर ही वाडोस हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होती. तीने शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी विरालीच्या नातेवाईकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार देत एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर  संशय व्यक्त कारवाईची मागणी केली. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी वेगाने तपासाची सुत्रे फिरवत एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला . त्यानंतर त्याला सावंतवाडी येथील बाल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ओरोस येथील बाल सुधार गृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहीती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

error: Content is protected !!