ठळक घडामोडी

कुडाळ येथे २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी ‘रोटरी महोत्सव’ची धूम!

इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो स्टॉल्सची पर्वणी : सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कुडाळ : प्रतिनिधी
     रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने रोटरी महोत्सव २०२५ चे आयोजन दि. २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात इंडस्ट्रीयल, फूड व ऑटो एक्स्पोचे विविध स्टाॅलची सहभागी होणार आहेत. विविध खाद्यपदार्थांच्या मेजवानीसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी क्लब अध्यक्ष राजीव पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दर दोन वर्षांनी सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळतर्फे हा महोत्सव आयोजित केला जातो. यंदाच्या महोत्सवात इंडस्ट्रियल, फूड तसेच ऑटो एक्स्पो अंतर्गत विविध स्टॉल्स उभारण्यात येणार असून सिंधुदुर्गवासीयांना खरेदी व पाहणीची मोठी संधी मिळणार आहे. फूड व इंडस्ट्रियल स्टॉल बुकिंगसाठी इच्छुकांनी एकनाथ पिंगुळकर (मो. ९४२२०५४६५२) यांच्याशी संपर्क साधावा. तर नामांकित कंपन्यांच्या फोर व्हिलर व टू व्हिलर वाहनांच्या ऑटो एक्स्पो स्टॉल बुकिंगसाठी प्रमोद भोगटे (मो. ९४२२६३३६०९) व अजिंक्य जामसंडेकर (मो. ९७६७९२४०५९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
     २९ डिसेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ७ वाजता लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ५ ते ११ वर्षे व १२ ते १६ वर्षे अशा दोन वयोगटांत होणार आहे. नावनोंदणी दि. २५ डिसेंबर पर्यंत ९३२५२८३३८४ व ९४२१२३८७२३ या क्रमांकांवर करावी. नावनोंदणी ३० स्पर्धकांपुरती मर्यादित असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
     ३० डिसेंबर रोजी इनरव्हिल पाककला स्पर्धा!
मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कुडाळ हायस्कूल मैदानावर इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने इनरव्हिल पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नावनोंदणी दि. २५ डिसेंबर पर्यंत ९४०५२४५३६९ व ९४२१२३८५२३ या क्रमांकांवर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
      दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
तीन दिवसीय रोटरी महोत्सवात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. सध्या रोटरी महोत्सवाच्या जय्यत तयारीला वेग आला असून कुडाळसह सिंधुदुर्गवासियांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी अध्यक्ष राजीव पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!