ठळक घडामोडी

आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव…!

उपजिल्हाधिकारी विकास सूर्यवंशी व वर्षा झाल्टे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती

मतमोजणी व जत्रोत्सव एकाच दिवशी; ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत विशेष प्रशासन व्यवस्था

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. याच दिवशी मालवण तालुक्यातील श्री भराडी देवी, आंगणेवाडी येथे वार्षिक जत्रोत्सव असणार आहे. यामुळे यापूर्वी जिल्ह्यात कामकाज केलेले  विकास सूर्यवंशी व श्रीमती वर्षा झाल्टे यांची श्री भराडी देवी, आंगणेवाडी येथे वार्षिक जत्रोत्सवकामी कायदा व सुव्यवस्था व इतर बाबींची पूर्तता करून कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी 7 फेब्रुवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे जिल्हा प्रशासनाद्वारे कळविण्यात आले आहे.
       जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कुडाळ हे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार मालवण हे  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने  निवडणूक कामकाजात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे यापूर्वी जिल्ह्यात कामकाज केलेले अधिकारी श्री विकास सूर्यवंशी (सध्या नियुक्ती : उपजिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक ( वसाहत व्यवस्थापक ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई ) आणि श्रीमती वर्षा झाल्टे (सध्या नियुक्ती: उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी मुंबई गव्हर्नमेंट प्रीमायसेस मुंबई) यांची भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2003 चे कलम 15 अन्वये श्री भराडी देवी आंगणेवाडी, तालुका मालवण येथे वार्षिक जत्रोत्सवकामी कायदा व सुव्यवस्था व इतर बाबींचे पूर्तता करून कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. वरील दोन्ही अधिकाऱ्यांना या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 148 , 152,  162 व 163 अंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

error: Content is protected !!