देवेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – कवठी वस्तीची एसटी बसफेरी वारंवार उशिराने सुटत असल्याने या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशी, शालेय मुले, कामगार वर्ग यांची गैरसोय होत आहे. याबाबत चेंदवण, कवठी, वालावल, नेरूर येथील महिला प्रवाशांनी शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक तसेच चेंदवण माजी उपसरपंच सौ.रश्मी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ आगार येथे आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांना निवेदन देत ही बसफेरी वेळेत सोडून गैरसोय दूर करण्याची मागणी केली.









