ठळक घडामोडी

मालवणात बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी

मालवण : प्रतिनिधी

     बांगलादेश मध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी आणि तेथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बुधवारी मालवणात भरड नाका येथे हिंदू बांधव भगिनींनी एकत्र येत बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. बांगलादेश मुर्दाबाद… भारत माता की जय… वंदे मातरम… घराघरातून करा पुकार… हिंदुत्वाचा जयजयकार अशा घोषणा यावेळी देतानाच बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत तो जाळण्यात आला.

    यावेळी विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष भाऊ सामंत, प्रखंड सहमंत्री हरेश पडते, बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, स्वप्निल गाडी पार्थ डिचवलकर, सुरेश मानवर, शिवशंभू विचार मंचचे जिल्हा संयोजक भूषण साटम, नगरसेवक मंदार केणी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, सनातन संस्थेचे राजन सकपाळ, दीनानाथ गावडे, महेंद्र पाताडे, अरविंद मयेकर, पंकज नेरकर, श्रीराम परब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे श्रीधर काळे, स्वराज्य संघटनेच्या सौ. शिल्पा खोत, माजी नगरसेविका पूजा सरकारे, राणी कुडाळकर, तनु भगत, अंजना सामंत, महिमा मयेकर, अमिता न्हिवेकर, राजेश वळंजू, मंदार सरजोशी, अजित आचरेकर, अशोक चव्हाण, बाबी चव्हाण, राजू आंबेरकर, हरी चव्हाण, मिलिंद झाड, नंदू गवंडी, निलेश गवंडी, शरद मोरे, ओम अटक, अमन गोडवले, आनंद आचरेकर आदी व इतर उपस्थित होते. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीय सुरक्षित नसून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, याविरोधात भारतातील हिंदूंनी एकवटून आवाज उठवीला पाहिजे, हिंदूंनी आता जागृत झाले पाहिजे, असे यावेळी भाऊ सामंत म्हणाले.

error: Content is protected !!