१० एप्रिल रोजी ‘सुपर सिक्स चॅलेंजर’ कॅरम स्पर्धा
कुडाळ : प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग–रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व भारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुका यांच्या वतीने जिल्हास्तरीय ‘सुपर सिक्स चॅलेंजर’ कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पार पडणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा २०२६-२७ हंगामातील पहिली स्पर्धा ठरणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूने नोंदणी शुल्क रुपये १०० असोसिएशनकडे जमा करणे आवश्यक असून, सर्व खेळाडूंची प्रवेश फी आयोजकांकडून भरली जाणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, पहिल्या आठ क्रमांकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच ‘व्हाईट स्लॅम’ व ‘ब्लॅक स्लॅम’साठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. खेळाडूंना सकाळी नाश्ता/चहा तसेच संध्याकाळी स्नॅक्सचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख ७ एप्रिल २०२६ असून सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, देवगड आणि मालवण येथे प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
*नावनोंदणीसाठी संपर्क*
सावंतवाडी – राजेश निर्गुण 7517535028
कुडाळ – शुक्राचार्य म्हाडेश्वर 9421238518
वेंगुर्ला – ओंकार कुबल 7276523372
कणकवली – अनिल कम्मार 9370588308
देवगड – प्रकाश प्रभू 9423303822
मालवण – संतोष बनसोडे 9423302707
विशेष नियमावली (सुपर सिक्स चॅलेंजर)
स्पर्धा ‘सुपर सिक्स’ पद्धतीने खेळविण्यात येणार असून पारंपरिक ८ बोर्डांच्या ऐवजी ६ बोर्डांचे ३ सेट खेळविण्यात येतील. खेळात काही विशेष नियम लागू करण्यात आले असून अपोनंटची सिंगल पीस डिफेन्स करता येणार नाही. स्वतःची सोंगटी किंवा क्वीनला स्ट्राइकरचा स्पर्श करूनच दुसऱ्याची सोंगटी हलवता येईल. चुकीच्या पद्धतीने फक्त दुसऱ्याच्या सोंगटीला स्ट्राइकरचा स्पर्श झाल्यास फाऊल होईल. शक्य असल्यास हललेली सोंगटी / सोंगट्या पुन्हा पूर्व स्थितीत ठेवण्यात येतील. गेम टाय झाल्यास टायब्रेकर आणि सडन डेथ चा वापर होईल. स्पर्धा एकाच खुल्या गटात खेळविण्यात येईल. पहिल्या राऊंड पासून ६ बोर्डांचे ३ गेम खेळविण्यात येतील. खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव व लोगो असलेला पांढरा टी-शर्ट आणि फुल पॅन्ट परिधान करणे अनिवार्य राहणार आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे तसेच भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.









