ठळक घडामोडी

विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदी दुरुस्तीसाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; ऐतिहासिक वारशाला मिळाले बळ

एएसआयमार्फत दर्या बुरुज भागातील दुरुस्तीचे काम लवकरच

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
         विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराच्या इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्याच्या संवर्धनासाठी पालकमंत्री नितेश राणे हे कायम प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (Archaeological Survey of India), भारत सरकार यांच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे.
       विजयदुर्ग किल्ल्यातील दर्या बुरुज भागातील तटबंदी काही ठिकाणी खराब झाली असून, भिंतींमध्ये पडलेल्या पोकळ्या व तडे बुजविण्याचे काम या निधीतून केले जाणार आहे. तसेच किल्ल्याची मूळ रचना कायम ठेवून दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम मुंबई सर्कल अंतर्गत विजयदुर्ग उपविभागामार्फत राबविण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे किल्ल्याचे पुढील नुकसान थांबवण्यास मदत होणार असून, ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे. सदर निधी मंजुरीला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यांनी मान्यता दिली आहे. लवकरच दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

error: Content is protected !!