ठळक घडामोडी

आमदार निलेश राणे यांनी मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्षात आढावा घेऊन विधानसभेत आवाज उठवावा!

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी

अत्यावश्यक गंभीर बाब म्हणून कुडाळहून गोवा बांबोळीला पाठवलेल्या महिलेची नॉर्मल प्रसुती; स्थानिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह – किनळेकर

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ मतदारसंघातील सरकारी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर आहे. अलिकडेच मधील महिला व बाल रुग्णालय येथून अत्यावश्यक गंभीर बाब म्हणून गोवा बांबोळीला पाठवलेल्या महिलेची नॉर्मल प्रसुती झाली असून स्थानिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आमदार निलेश राणे यांनी मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्षात आढावा घेऊन पुढील विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
       कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या गेल्या तिन विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडल्या. परंतु यामधील एक मुख्य समस्या म्हणजे आरोग्य व्यवस्था. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ मालवण मधील रुग्णालये तसेच महिला बाल रुग्णालय यांच्या आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्षात पाहणी करून त्याची योग्यरित्या उपाययोजना करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा. आणि नुसता आवाज उठवूनच चालणार नाही तर त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलावीत.
सद्यस्थितीमध्ये कुडाळ ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिस्थिती पाहता त्या ठिकाणी उपलब्ध कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेले डॉक्टर यांना वेळेवर वेतन देखील मिळत नसल्यामुळे अनेकदा ते काम सोडून जातात व त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. आता जनतेसाठी नुसत्या घोषणा नको तर प्रत्यक्षात मूलभूत प्रश्नावर तोडगा हवा त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्षात जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी या पत्रकांद्वारे मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!