ठळक घडामोडी

तेंडोली-आदोसेवाडीत लोकशाहीचा सुंदर संदेश!

नववधू अंजली राऊळ यांचे लग्नाआधीच लोकशाहीला प्राधान्य

मतदान केंद्र क्रमांक २७० येथे बजावला मतदानाचा हक्क

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील तेंडोली-आदोसेवाडी येथील नववधू अंजली राऊळ यांनी लग्नाच्या धावपळीतही आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती जागरूकतेचा आदर्श घालून दिला. तेंडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान केंद्र क्र. २७० येथे आज त्यांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर त्या थेट लग्न मंडपाकडे रवाना झाल्या. नववधूने मतदानाला दिलेले प्राधान्य उपस्थित मतदारांमध्ये कौतुकाचा विषय ठरले.

error: Content is protected !!