ठळक घडामोडी

कुडाळ एमआयडीसीत अंमली पदार्थांवर पोलिसांची धडक कारवाई!

९० हून अधिक पाऊच जप्त, एक युवक ताब्यात

कुडाळ : प्रतिनिधी
          कुडाळ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ (गांजासदृश) बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने आज एमआयडीसी परिसरात छापा टाकल्याचे समजते.
       या कारवाईदरम्यान एका युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून तब्बल ९० हून अधिक पाऊच जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या प्रकरणी कुडाळ पोलिसांकडून पुढील तपास आणि कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

error: Content is protected !!