कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हापण येथील सिता राम संजीवनी आनंदाश्रम परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आश्रम परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुशोभित राहावा, या उद्देशाने ही साफसफाई करण्यात आली.
ग्रास कटरच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम राबवत परिसरात स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेदरम्यान सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये, माजी सरपंच सौ. आरती पाटील व सौ. पूजा सर्वेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत, प्रसाद सर्वेकर, नागेश आरोलकर व विनोद मोर्ये यांनी आश्रमास सदिच्छा भेट दिली. यावेळी आश्रमाच्या मुख्य आरोग्य सेविका सौ. सानिका तुळसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व परिसराची साफसफाई केल्याबद्दल आंदुर्ले ग्रामपंचायतीचे आभार मानले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.









