पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन
मालवण : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तालुका कार्यकारिणीची सभा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ठाकरे शिवसेना शाखा, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथ प्रमुख तसेच युवासेना, महिला आघाडी व युवतीसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.









