११ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन
मालवण : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंतीचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुस्तक वाचन उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, वाचक नागरिक सहभागी होऊ शकतात. 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता साने गुरुजी वाचन मंदिरामधील वाचनालयातील वाचकांच्या आवडीचे पुस्तक वाचनासाठी दिले जाईल. वाचकांनी दिवसभराच्या कालावधीत हे पुस्तक वाचायचे आहे. पुस्तक वाचून झाल्यावर पुस्तकाविषयीचे मनोगत वाचकांनी व्यक्त करायचे आहे. वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी तसेच महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमातील सहभागी वाचकांना पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुस्तक वाचन उपक्रमात जास्तीत जास्त वाचक आणि सहभागी व्हावे असे आवाहन समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी व बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने करण्यात आले आहे
या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क लक्ष्मीकांत खोबरेकर (बॅ. नाथ पै सेवांगण कार्यवाह -9422946212)
संग्राम कासले (मालवण समतादूत- 9420824874)
ऋतुजा केळकर (ग्रंथपाल – 9420423790)









