विट्ठल देसाई मित्रमंडळाच्या वतीने आयोजन
कणकवली : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने ‘खासदार श्री २०२६ ’ या शरीरसौष्ठव स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा १० एप्रिल रोजी सायं. 5.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. सदरची स्पर्धा 55, 60, 65 व 70 अशा चार वजनी गटात होणार आहे. प्रत्येक गटात अनुक्रमे प्रथम 3 हजार, द्वितीय 2 हजार, तृतीय 1500 रु., चतुर्थ व पाचव्या क्रमांकासाठी 1 हजार रुपये तसेच प्रत्येकी स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मयार्दीत असणार आहे. या स्पधेर्तील विजेत्याला ह्णखासदार श्री 2026ह्ण हे प्रथम क्रमांकाचे बक्षिस रु. 15 हजार, मानाचा पट्टा व चषक देऊन गौरविण्यात येणार आहेत. तसेच बेस्ट पोझर, बेस्ट इम्प्रुव्हड प्रत्येकी 3 हजार रुपये व इतर आकर्षक बक्षिसेही असणार आहेत. स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांनी केले आहे. तसेच अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी राजन परब, अमित कदम यांच्याशी संपर्क साधावा.









