उमेदवारांची धाकधूक वाढली
मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सर्व मतमोजणी केंद्रांवर प्रशासन सज्ज झाले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, उमेदवार व समर्थकांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. सुरूवातीला टपाली मतमोजणी होणार असून, ती पूर्ण होताच इव्हीएम मशीन मतमोजणीला सुरुवात होणार आहे.









