ठळक घडामोडी

वेताळबांबर्डे ब्रीजवर कार-दुचाकीची समोरासमोर धडक!

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; दुचाकीवरील दोघे जखमी

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीमुळे अपघात

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ जवळील वेताळ बांबर्डे ब्रीजवर मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी कार यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला.
     उपलब्ध माहितीनुसार, सदर कार कणकवलीहून कुडाळच्या दिशेने जात होती. संबंधित कार ब्रीजवर आली असता समोरून विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी अचानक कारसमोर आल्याने दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कारमधील कोणालाही दुखापत झालेली नाही.

error: Content is protected !!