

अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शुक्रवार पासून प्रक्रिया सुरू झाली आहे. कुडाळ तालुक्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र अर्ज खरेदीसाठी इच्छुक उमेदवारांची तहसीलदार कार्यालयात गर्दी झाली होती.
दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी २८ अशा एकूण ५१ अर्जांची विक्री झाली. त्यामुळे दोन दिवसांत एकूण ६५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहीती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांसह अपक्षांनी शनिवारी उमेदवारी अर्ज खरेदी केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २१ जानेवारीपर्यंत असून पुढील चार दिवसांत अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. ५ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.









