ठळक घडामोडी

पिंगुळीत ठाकरे शिवसेनेचा प्रचार शिगेला; गावागावांत फेऱ्या, मतदारांशी थेट संवाद!

गंगाराम सडवेलकर–ममता राऊळ–कृष्णा धुरी यांच्या प्रचाराला वेग; विजयाचा विश्वास

कुडाळ : प्रतिनिधी
       पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, संपूर्ण मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. पिंगुळी जिल्हा परिषदेचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत समितीच्या उमेदवार ममता राऊळ तसेच साळगाव पंचायत समितीचे उमेदवार कृष्णा धुरी यांनी प्रचाराला वेग देत गावागावांत प्रचार फेऱ्या काढून मतदारांच्या थेट गाठीभेटींवर भर दिला आहे.
      पिंगुळी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या प्रचारासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानात उतरली असून, उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाचा ठोस अजेंडा घेऊन उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत असून, भविष्यातील विकासाचे स्पष्ट व्हिजन जनतेसमोर मांडण्यात येत आहे.
ठाकरे शिवसेनेचा वचननामा घराघरांत पोहोचवला जात असून, प्रचार अंतिम टप्प्यात निर्णायक वळणावर आला आहे. कुडाळमधील ठाकरे शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पिंगुळी मतदारसंघात तळ ठोकून सक्रियपणे प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता पिंगुळी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उमेदवार गंगाराम सडवेलकर, ममता राऊळ व कृष्णा धुरी यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!