ठळक घडामोडी

मालवण समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करणारी कर्नाटक राज्यातील मासेमारी नौका जप्त

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई

मालवण : प्रतिनिधी

    मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८९ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.
२५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास मालवण समोर समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी शगणेश टेमकर, सहाय्यक मत्स्य, विकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) हे नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली  राज्य कर्नाटक राज्यातील नौका  महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोरील समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना पकडले. या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे.

अंमलबजावणी अधिकारी श्री. गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्य, विकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) यांनी पोलिस कर्मचारी श्री अर्जुन बांदिवडेकर तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक, मालवण यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.

error: Content is protected !!