वेंगुर्ला : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी तळेकरवाडी सडा कार्यक्षेत्रातील आवेरा येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आकस्मिक आग लागून आंबा व काजूची कलमे जळून खाक झाली. या आगीत सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, माळरानावरील सुमारे 10 हेक्टर क्षेत्रातील चारा मोठ्या प्रमाणात जळून नष्ट झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. अग्निशमन बंबही पाचारण करण्यात आला होता.









