

कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती कुडाळ सार्वत्रिक निवडणूक 2026 अनुषंगाने निवडणूक कर्तव्यावर असलेल्या व PB-1 फॉर्म सादर केलेल्या कुडाळ तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
ही सुविधा तहसीलदार कार्यालय, कुडाळ येथे उपलब्ध असून, ठरावीक कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून टपाली मतदान करावे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. मंगळवार दि. 3 ते गुरुवार दि. 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तर शुक्रवार दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत टपाली मतदान करता येणार आहे.तरी सर्व संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.








