ठळक घडामोडी

कणकवली नगराध्यक्षपदाचा संदेश पारकर यांनी स्विकारला पदभार

कणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायत निवडणूकीत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी सोमवारी सकाळी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी पारकर यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी नगरपंचायतसमोर स्वागतासाठी गर्दी केली होती. तब्बल १७ वषार्नंतर पुन्हा एकदा कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी संदेश पारकर यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह दिसत होता. संदेश पारकर यांनी नगरपंचायतच्या पायरीवर नतमस्तक होवुन कणकवलीकरांचे आभार मानले.
   यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासमवेत माजी आमदार राजन तेली, ठाकरे शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक, जाई मुरकर, दीपिका जाधव, रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख दामू सावंत, प्रथमेश तेली, अ‍ॅड. सुदीप कांबळे, माजी उनगराध्यक्ष कन्हैया पारकर, माजी नगरसेवक उमेश वाळके, भूषण परुळेकर, राष्टÑवादी (श.पा.) तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सुनील पारकर, बाळू पारकर, उत्तम वाळके, सोहम वाळके, प्रदीप आरोलकर, नीलम सावंत-पालव, साक्षी आमडोसकर, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, रिना जोगळे, स्नेहा वाळके, आदित्य सापळे, वैभव मालंडकर, अमित मांडवकर, सौरभ पारकर यांच्यासह शेडको कार्यकर्ते उपस्थित होते.
नगराध्यक्षाच्या दालनात संदेश पारकर यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर पारकर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारल्यानंतर न. पं. च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी पारकर यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. पारकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना प.पू. भालचंद्र महाराज यांची प्रतिमा भेट स्वरुपात देण्यात आली. तसेच पारकर यांना कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!