ठळक घडामोडी

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा २१ डिसेंबरला

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा बहुप्रतिक्षित माजी विद्यार्थी मेळावा रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. हा मेळावा सकाळी १० वाजता, एकनाथ ठाकूर सभागृह, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे संपन्न होणार आहे. या मेळाव्यास महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे २००० सालच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण प्रवासाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचा रौप्य महोत्सव. या निमित्ताने त्या बॅचच्या आठवणी, अनुभव आणि यशोगाथा साजऱ्या करण्यात येणार असून हा क्षण सर्वांसाठीच भावनिक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे. मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी माजी विद्यार्थी मेळावा आयोजन समितीच्या समन्वयक प्रा. काजल मातोंडकर (मो. ७२१९७२७१८४) यांच्याशी संपर्क साधावा.
जुन्या आठवणींना उजाळा देणारा, मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारा आणि महाविद्यालयाशी नाते पुनः जोडणारा हा मेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!