श्री देव रवळनाथाच्या हुकुमानंतर गावपळण सुरू
गावातील देऊळ, शाळा, घरे झाली बंद
मालवण : प्रतिनिधी
शेकडो वर्षा पूर्वी पासून कोकणातील गावपळणीची परंपरा असणाऱ्या गावांपैकी मालवण तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वायंगणी गावात ढोलांचा गजर झाला आणि गावपळण कार्यक्रम सोमवार पासून सुरू झाला. श्री देव रवळनाथाच्या कौलाने सुमारे २००० हजार वस्तीच्या गाव देवांसहित व रयतेला घेऊन वेशीबाहेर तीन दिवस तीन रात्रींसाठी वास्तव्यास गेला. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली प्राचीन प्रथा आजही आधुनिकतेकडे जाणाऱ्या प्रवाहातही वायंगणी गावातील ग्रामस्थ स्वखुशीने आजही तेवढीच श्रद्धा पूर्वक जपत आहेत.
देवपळणीसह वायंगणीची गावपळण
संस्थानकालीन असलेल्या आचरा गावांमध्ये होणाऱ्या गावपळणीत गावातील ग्रामस्थ फक्त गावाबाहेर जातात. परंतु, वायंगणी गावातील ग्रामदैवत श्री. देव रवळनाथ हे चिंदर सडेवाडी येथे वास्तव्यास गावपळणीच्या दिवशी पहाटेच्या वेळी अगदी चिडीचूप पणे गावातील मानकरी व सेवे करी ग्रामदेवतेचे प्रतीक असलेले श्री फळ घेऊन 2.30 च्या सुमारास मानकऱ्यांसह जातो. त्याठिकाणी असलेल्या घुमटीत देवाचे प्रतिक असलेले श्रीफळ ठेवून त्यांची पुजा अर्चा होते. यावेळी मात्र गावातील देवळात पुजा होत नाही. देवासह गावातील ग्रामस्थ देवाच्या सानिध्यात वेशीबाहेर वास्तव्य करतात. देवपळण व गावपळण यांचा संयुक्त मिलाफ या वायंगणी गावाच्या गावपळणीत पहावयास मिळतो आहे .
26 रोजी परतीचा कौल
श्री देव रवळनाथाच्या कौलाने वेशीबाहेर गेलेला
गाव हा तीन दिवस, तीन रात्री नंतर देव रवळनाथ यांच्या हुकुमाने गाव वेशीबाहेर जातो. तीन दिवसाची मर्यादा 26 रोजी पुर्ण होत असून यावेळी गावाचे बारापाच मानकरी व ग्रामस्थ सकाळी १० च्या सुमारास गाव भरण्याचा कौल होणार आहेत. देवाने कौल दिल्यास वेशीबाहेर गेलेला गाव परत वायंगणी गावात परतनार आहे.
वायंगणी गाव देतो श्रद्धेतून पर्यावरणाचा संदेश
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व
जातीपातीचा धर्माचा विसर पडून वायंगणीचे ग्रामस्थ एकोप्याने श्रद्धेने गावपळणीत सहभागी झाले. श्रद्धा म्हणुन गावपळण करत असताना गाव निर्रमनुष्य होऊन गावाचे वातावरण शुद्ध होण्यास ग्रामस्थ एकप्रकारे हातभार लावताना दिसत आहेत. वायंणीतील ग्रामस्थ आचरा हिर्लेवाडी, कालावल, सडयेवाडी, चिंदर, सडेवाडी भागात राहुट्या करून गुरूढोरे, कोंबडी, कुत्रे, मांजर,अन्य लागणाऱ्या साहित्यासह वास्तव्यास वेशीबाहेर रवाना झाले. तीन दिवस, तीन रात्री गावातील ग्रामस्थ एकत्र एकोप्याने राहत निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला सामावून घेतात. यावेळी त्यांना मोबाईल व्हॉटसअॅपचाही विसर पडतो.मागील सण 2019 मध्ये मार्च महिन्यात वायंगणी गावची गावपळण, देवपळण झाली होती.







