कामगार व त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक, क्रीडा व आरोग्य योजनांचा लाभ
ऑनलाइन अर्जासाठी www.public.mlwb.in व MAHADBT पोर्टल उपलब्ध
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
कामगार कल्याण मंडळाच्या चालू वर्षापासूनच्या धोरणानुसार कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) योजना आता वर्षभर खुल्या ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती चिपळूणचे प्रभारी कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिली. यापूर्वी अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात येत होती; मात्र आता www.public.mlwb.in तसेच शासनाच्या MAHADBT ‘आपले सरकार’ पोर्टलवर या योजना कायमस्वरूपी खुल्या राहणार आहेत. या निर्णयामुळे वेळेवर गुणपत्रक, बोनाफाईड व इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध न होणाऱ्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पात्रतेचे निकष
पूर्वीप्रमाणेच ५ किंवा अधिक कामगार संख्या असणाऱ्या आस्थापनातील व महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (रु. २५ – जून व डिसेंबर या दोन हप्त्यांत) भरणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना तसेच लिननंबर धारक कामगारांना या योजनांचा लाभ मिळणार आहे.
योजनांचे स्वरूप
शैक्षणिक, क्रीडा व अन्य विविध योजनांद्वारे प्रतिवर्षी रु. २,००० ते ५०,००० पर्यंत लाभ देण्यात येतो.
सर्वसाधारण शिष्यवृत्ती (इ. ९ वी ते १२ वी) – रु. २,०००
उच्चशिक्षण शिष्यवृत्ती – रु. २,५००
पदव्युत्तर शिक्षण – रु. ३,०००
व्यावसायिक पदविका/आयटीआय – रु. २,५००
व्यावसायिक पदवी/पदव्युत्तर (इंजिनिअरिंग, मेडिकल, पॅरामेडिकल, व्यवस्थापन) – रु. ५,०००
आंतरराष्ट्रीय क्रीडा सहभाग – रु. १५,०००
राष्ट्रीय/राज्यस्तरीय क्रीडा प्राविण्य – रु. २,००० ते ७,०००
पीएचडी नोंदणी – रु. ५,०००
यूपीएससी/एमपीएससी परीक्षांसाठी सहाय्य – रु. ५,००० ते ८,०००
परदेश शिक्षण (पदव्युत्तर/पीएचडी) – रु. ५०,०००
पाठ्यपुस्तक खरेदी अनुदान, एमएस-सीआयटी, टंकलेखन, वाहन प्रशिक्षण, शिवण मशीन अनुदान व गंभीर आजार उपचार सहाय्यता (रु. ५,००० ते २५,०००) आदी योजना लागू आहेत. तरी कोकण गटातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित केंद्र संचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन राजेंद्र निकम यांनी केले आहे.
संपर्क व अधिक माहितीसाठी –
राजेन्द्र निकम प्रभारी कामगार कल्याण अधिकारी चिपळूण 8855883164
संतोष नेवरेकर केंद्र संचालक कणकवली व मालवण
9890279215
दिपक गायकवाड केंद्रसंचालक महाड 7776880603
नम्रता आराबेकर सावंतवाडी 9421264800
सुष्मिता नाईक कुडाळ 9403369900
पूजा नागवेकर रत्नागिरी
7972641623
स्नेहा चव्हाण चिपळूण
8806075401
संगीता सुवार पोफळी
9822367218








