ठळक घडामोडी

पिंगुळी मतदारसंघात घराघरांत महायुतीचा प्रचार; पदाधिकारी – कार्यकर्त्यांची मोठी फौज

अजय आकेरकर, साधना माडये, मिलिंद नाईक यांच्या प्रचार फे-यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : प्रतिनिधी
      पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलाच वेग घेतला आहे. पिंगुळीत जि.प.चे उमेदवार अजय आकेरकर आणि पं.स.चे उमेदवार साधना माडये यांच्या प्रचारात भाजपच्या दिग्गज मंडळींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. कुडाळ मधील भाजपाच्या नगरसेवकांनाही प्रचारात सहभाग घेत, घर टू घर प्रचार केला.
        पिंगुळी जि.प.चे उमेदवार अजय आकेरकर, पं.स. उमेदवार साधना माडये व साळगाव पं.स.चे उमेदवार मिलिंद नाईक यांनी मतदारसंघात प्रचारात वेग घेतला आहे. गावागावात प्रचार फेरी काढून ग्रामस्थ व मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत वचननामा थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत असून, महायुतीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांच्यासह महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी मैदानात उतरत प्रचारात सहभाग घेतला. कुडाळ मधील भाजपाचे नगरसेवकही पिंगुळीत तळ ठोकून आहेत. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे प्रचारात उतरले असून, जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अजय आकेरकर यांनी सांगितले. प्रचारादरम्यान जनतेकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता, महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!