ठळक घडामोडी

ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीच्या घोषणेनंतर वैभववाडीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

वैभववाडी : प्रतिनिधी
     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे शिवसेना–मनसे युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घोषणेनंतर वैभववाडीत ठाकरे शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके वाजवून, जोरदार घोषणा देत जलोष केला. “शिवसेना–मनसे युती जिंदाबाद”, “मराठी एकीचा विजय असो” अशा घोषणांनी वैभववाडी संभाजी चौक दणाणून गेला.
   या वेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत, या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व सुरू होईल आणि मराठी माणसाची ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. वैभववाडी चौकात झालेल्या या उत्स्फूर्त जल्लोषामुळे नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. या प्रसंगी ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिंदे, मनसे जिल्हा सचिव सचिन तावडे, मनसे तालुका अध्यक्ष महेश कदम, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण,शिवसेना तालुका सचिव गुलजार काझी, विभाग प्रमुख यशवंत गवाणकर, स्वप्नील रावराणे, दीपक पवार, ओमकार इस्वलकर, श्री शिवाजी पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!