ठळक घडामोडी

माजी आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक घेतले श्री भराडी मातेचे दर्शन

मालवण : प्रतिनिधी
      लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून भराडी मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी वैभव नाईक व स्नेहा नाईक यांनी जत्रोत्सवातील मसुरे-पोईप व आंगणेवाडी शिवसेना शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.तसेच जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून राबविलेल्या मोफत बिसलेरी पाणी वाटप स्टॉलला भेट देऊन पाणी वाटप केले.

error: Content is protected !!