ठळक घडामोडी

कुडाळला चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कलागुणांनी स्नेहसंमेलन रंगले!

बालवाडी म्हणजे संस्कारांची पहिली शाळा – सई काळप

सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित भगिनी मंडळ बालवाडीचा स्नेहसंमेलन उत्साहात

कुडाळ : प्रतिनिधी
     सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित कुडाळ भगिनी मंडळ बालवाडीच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीते व अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
     हे स्नेहसंमेलन शनिवारी कुडाळ मधील सावंतवाडी संस्थानच्या मराठा समाज सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या सई काळप होत्या. अध्यक्षीय भाषणात सई काळप म्हणाल्या, “बालवाडी ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. येथे केवळ अक्षरओळख दिली जात नाही, तर शिस्त, सवयी व संस्कारांची पायाभरणी केली जाते. लहान वयात मुलांच्या कलागुणांना वाव देणे सोपे नसते. त्यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि पालकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे.” आई-वडील व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी व्हा, अशा शुभेच्छाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी समीर वेंगुर्लेकर, समाजाचे कार्यकारी विश्वस्त सतीश सावंत, अनुश्री माळगावकर, उपाध्यक्ष शशिकांत गावडे, नरेंद्र सावंत, चिटणीस दिलीप दळवी, खजिनदार किशोर सावंत, संस्था हितचिंतक जितेंद्र पवार, कुडाळ समिती प्रमुख आर. एल. परब, समन्वयक नंदकिशोर गावडे, भगिनी मंडळ बालवाडी महिला अध्यक्ष डॉ. दिपाली काजरेकर, उपाध्यक्ष स्वाती सावंत, पालक व शिक्षकवर्ग उपस्थित होते. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आदर्श विद्यार्थी म्हणून अन्वित अनंत राणे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!