टेंट पिगिंग व्यक्तिगत स्पर्धेत देशात अव्वल कामगिरी
बीएसएफ चॅलेंज ट्रॉफीवर नाव कोरले
दोडामार्ग : प्रतिनिधी
अखिल भारतीय पोलीस घोडेस्वारी स्पर्धा २०२६ मध्ये टेंट पिगिंग (Tent Pegging) व्यक्तिगत स्पर्धेमध्ये सरगवे गावचे सुपुत्र राहुल अजय सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या स्पर्धेत देशभरातून एकूण १०१ स्पर्धक सहभागी झाले होते. तर २५ संघ, ज्यात सर्व राज्यांचे पोलीस दल तसेच पॅरामिलिटरी दलांचा समावेश होता.
टेंट पिगिंग ही घोडेस्वारीतील एक अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तंत्रसंपन्न खेळ आहे, ज्यामध्ये रेसिंग करत असताना लक्ष्यावर निशाणा साधणे आवश्यक असते. अशा कठीण परिस्थितीत, राहुल अजय सावंत यांनी आपल्या घोडेस्वारी कौशल्य, धैर्य आणि अचूक निशाणा दाखवून दिले. या स्पर्धेत त्यांनी बीएसएफ (BSF) चॅलेंज ट्रॉफी जिंकली आहे. देशभरातील पोलीस व पॅरा मिलिटरी दलांमध्ये चाललेल्या या स्पर्धेत राहुल यांचा हा विजय त्यांच्या अपार मेहनतीचा आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातील कौतुक होत आहे.









