२९, ३० व ३१ डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानावर सांस्कृतिक पर्वणी
कुडाळ : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानावर दि. २९, ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो चे आयोजन करण्यात आले असून नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, रोटरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. राजीव बिले, राजन बोभाटे, शशिकांत चव्हाण, गजानन कांदळगावकर, सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, अजिंक्य जामसंडेकर आदी आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार यांनी सांगितले की, या महोत्सवात विविध इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो मध्ये देशातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
प्रमुख व सहप्रायोजक
या महोत्सवाचे वामन हरि पेठे ज्वेलर्स प्रमुख प्रायोजक असून सारस्वत बँक व क्रांती सिरॅमिक सहप्रायोजक आहेत.
तसेच डॉ. जी. टी. राणे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, कोकण कॅन्सर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, संजिवनी एंटरप्रायजेस, ॲक्युरेट इंजिनिअरिंग वर्क्स, इन्स्पायर सायकल, तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी आदी महोत्सव प्रायोजक भागीदार आहेत. आणखी प्रायोजक भागीदारांसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अध्यक्ष पवार यांनी सांगितले.
दिवसागणिक कार्यक्रम
◆ २९ डिसेंबर :
‘नृत्य, हास्य आणि सुरांचा संगम’ या कार्यक्रमात सुर नवा ध्यास नवा फेम गायक निखिल मधाळे, झी युवा सिंगर फेम गायिका ब्रम्हनंदा पाटणकर, गायक हर्षद मेस्त्री आणि विनोदाचा बादशहा दिव्येश शिरवडकर उपस्थित राहणार आहेत.
याच दिवशी ५ ते ११ व १२ ते १६ वयोगटातील फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून प्रत्येकी ३० स्पर्धकांपुरतीच मर्यादा राहणार आहे.
◆ ३० डिसेंबर :
६५ कलाकारांचा सहभाग असलेला साई कला मंच निर्मित ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच इनर व्हील क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने मोड आलेल्या कडधान्यांवर आधारित पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
◆ ३१ डिसेंबर :
साई जळवी फिल्म प्रस्तूत अफलातून मनोरंजनाचा धुमधडाका कार्यक्रम होणार असून यात सुपरस्टार संतोष जुवेकर, तू आभाळ फेम पार्श्वगायक रविंद्र खोमने, महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त गायिका अमिता घुगरी, कोकणचा महागायक सागर कुडाळकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना नुपूर जोशी तसेच निवेदक किरण खोत सहभागी होणार आहेत.
भव्य लकी ड्रॉ सोडत
तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी पुरस्कृत लकी ड्रॉ सोडत महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी काढण्यात येणार असून आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
३१ डिसेंबर रोजी इन्स्पायर सायकल पुरस्कृत लकी ड्रॉमध्ये उपस्थित असलेल्या दोन महाभाग्यवान विजेत्यांना हिरो कंपनीच्या आकर्षक सायकली बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.
विशेष आकर्षणे
बांदा येथील ‘अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप’ चे कलाकार – २९ व ३१ डिसेंबर
भव्य ऑटो एक्स्पो : फोर व्हिलर व टू व्हिलर गाड्यांचे दालन
(महिंद्रा, ह्युंडाई, एमजी, सिट्रॉएन, बीवायडी, फोक्सव्हॅगन, सुझुकी, रॉयल एनफील्ड, टाटा, टोयोटा आदी नामांकित कंपन्यांचा सहभाग)
स्थानिक कलाकारांचे ग्रुप डान्स सादरीकरण
रोटरी महोत्सवासाठी नाममात्र प्रवेशिका ₹२० ठेवण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नववर्षाच्या स्वागतासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ सातत्याने या महोत्सवाचे आयोजन करीत असून सुटसुटीत नियोजन व आकर्षक कार्यक्रमांसाठी या महोत्सवाची ख्याती आहे.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सर्व सदस्य, इनर व्हील क्लब, रोट्रॅक्ट क्लब व इंटरॅक्ट क्लब ऑफ कुडाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे नमूद करण्यात आले. सिंधुदुर्गवासीयांनी कुटुंबासह या भव्य रोटरी महोत्सव 2025 ला उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. राजीव बिले यांनी केले आहे.









