विद्यार्थी-पालक-सेविकांचा सहभाग; सामाजिक एकोप्याचा सुंदर प्रत्यय
सरपंच पूनम वाटेगावकर यांच्या उपस्थितीत पारंपरिक उपक्रम साजरा
मालवण : प्रतिनिधी
गुलाबी थंडीत….पहाटेच्या लहरीत कुंभारमाठ जरीमरी व कुंभारमाठ या दोन्ही अंगणवाडींच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडी केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या “शेकोटी” कार्यक्रमात विद्यार्थी, पालक तसेच अंगणवाडी सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अनोखा आनंद अनुभवला.
या कार्यक्रमाला सरपंच सौ. पूनम वाटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच महाविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) च्या सर्व कार्यकारिणीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका भक्ती मांजरेकर, अंगणवाडी सेविका तनुजा गावठे, अंगणवाडी मदतनीस श्रेया भोगावकर व अंगणवाडी मदतनीस हर्षिता डिचवलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या शेकोटी कार्यक्रमास ग्रामस्थांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमातून सामूहिक सहभाग, सामाजिक एकोप्याची भावना व पारंपरिक संस्कृतीचे जतन यांचा सुंदर प्रत्यय आला.







