ठळक घडामोडी

माड्याचीवाडी येथे सिमेंट मिक्सर ट्रकला अपघात!

पुलाचा भाग खचल्याने मिक्सर ट्रक पलटी; चालक किरकोळ जखमी

पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना घडली घटना

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी–रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचा अपघात झाला. पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूचा भाग खचल्याने सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक येथे काॅलवेलगत खाली पलटी झाला. या अपघातात वाहनाच्या केबिनमध्ये चालक अडकला होता. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्पर मदतीने चालकाला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

error: Content is protected !!