

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणा-या ४ डंपर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत चांगलाच दणका दिला आहे. बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी प्रामुख्याने अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असते. तशा सूचना पोलिस प्रशासनाकडून डंपरसह अवघड वाहनधारकांना दिल्या आहेत. मात्र, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कुडाळ शहरातून मुख्य रस्त्याने वेगाने जाणा-या ४ डंपरवर पोलीस प्रशासनाने आज सायंकाळी ही कारवाई केली. कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल बंडगर, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वेदिका गावडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शर्मिला पाडगावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती रायशिरोडकर आणि पोलीस हेड कॉन्स्टबेल मेघश्याम भगत यांच्या टीमने ही कारवाई केली. चारही डंपर दंडात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्याच्या आवारात आणून उभे करण्यात आले होते. याबाबतची माहीती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.








