

१८ जानेवारीपर्यंत रंगणार सामने; उद्घाटनप्रसंगी मान्यवर – क्रिकेटप्रेमींची उपस्थिती
कुडाळ : प्रतिनिधी
सिद्धिविनायक स्पोर्ट्स पिंगुळी आयोजित सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार पासून प्रारंभ झाला. रविवार १८ जानेवारी २०२६ पर्यंत ही स्पर्धा परब सर्विसिंग सेंटर, पिंगुळी म्हापसेकरतिठा येथील मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सिद्धिविनायक मित्र मंडळ अध्यक्ष दिपक म्हापसेकर, पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, भरत परब, मालक राजन पुरलकर, लवु खोजुर्वेकर, कुणाल कुडाळकर, संजु परब, अजु परब, रोहन परब, राजा परब, विजु परब आदींसह मंडळाचे सदस्य व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. यावेळी दिपक गावडे यांनी सिद्धिविनायक स्पोर्ट्स मित्रमंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









