ग्रंथालय चळवळीत योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान
७ जानेवारी रोजी तारकर्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व सेवकांना देण्यात येणारे सन २०२५–२०२६ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
आदर्श ग्रंथालय संस्था पुरस्कार
– श्री आर्यादुर्गा वाचनमंदिर, वागदे (ता. कणकवली)
– कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय, सांगवे–कनेडी (ता. कणकवली)
आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
– श्री. नंदकुमार श्रीकृष्ण सोमण, सदस्य – श्री रामेश्वर वाचनालय, मिठबाव (ता. देवगड)
– श्री. प्रकाश किरात पेडणेकर, अध्यक्ष – ज्ञानदीप ग्रंथालय मंडळ, वायगणी पंचक्रोशी (ता. मालवण)
आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार
– श्री. संजय काशीनाथ शिंदे, ग्रंथपाल – नगर वाचन मंदिर, मालवण
– श्रीम. ऋतुजा राजेंद्र केळकर, ग्रंथपाल – ब. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण
हे पुरस्कार बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात सिंधुदुर्ग वाचन मंदिर, ब्ल्यू हेवन रिसॉर्ट, तारकर्ली येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष मंगेश मसके व कार्यवाह राजन पांचाळ यांनी दिली. निवड समितीत जिल्हा ग्रंथालय संघाचे तालुका प्रतिनिधी धाकू तानवडे (कणकवली), रुजारियो पिंटो (मालवण), संजय शिंदे व ऋतुजा केळकर यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.








