
देवगड : प्रतिनिधी
देवगड समुद्रात रविवारी दुपारी ‘अलमका’ ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्यामुळे आणि जोरदार लाटांमुळे बुडाली. मिठमुंबरी ते देवगड पवनक्की समोरील समुद्री पट्ट्यात सुमारे १ वाजता ही घटना घडली.
या नौकेवर तांडेलासह १५ ते २० खलाशी होते. नौका बुडू लागल्याने खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. जवळील ‘खतिजा’ नौका व स्थानिक मच्छिमारांनी तात्काळ मदत करत सर्वांना सुखरूप वाचवले. जीवितहानी टळली असली तरी नौकेचे इंजिन, जाळी व इतर साहित्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
मालवण समुद्रात शनिवारी दुपारी पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली होती. या घटनेच्या दुसया दिवशीच रविवारी देवगड समुद्रात मासेमारी नौका बुडाली.








