ठळक घडामोडी

पिंगुळी जि. प. मतदारसंघात घराघरांत ठाकरे शिवसेनेचा जनसंवाद!

शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा प्रचार वेगात; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गंगाराम सडवेलकर–ममता राऊळ–कृष्णा धुरी यांचा गावोगावी जनसंवाद

कुडाळ : प्रतिनिधी
       पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर तसेच पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ व कृष्णा धुरी यांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला असून मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी प्रचारफेऱ्या, घरभेटी, बैठका घेत मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे.
       प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्नांवर भर देण्यात येत असून विकासाभिमुख व लोकाभिमुख अजेंडा मतदारांसमोर मांडण्यात येत आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिवसैनिकांचा जोश यामुळे प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पिंगुळी मतदारसंघातील जनतेचा मिळणारा प्रेमळ प्रतिसाद आणि विश्वास मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच माझे ध्येय आहे. स्थानिक समस्या सोडविण्यासह मूलभूत सुविधांचा विकास, शेतकरी व महिलांचे सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जनतेच्या सहकार्याने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प मी केला आहे.”
     मतदारसंघातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त केला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धोरणांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचार फेरीला ग्रामस्थ व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आमचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास गंगाराम सडवेलकर यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!