शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत चर्चासत्राचे आयोजन
राज्य व राज्याबाहेरील मुख्याध्यापक आणि अधिकारी होणार सहभागी
कुडाळ : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथे होणा-या शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील उत्कृष्ट शैक्षणिक काम करणाऱ्या हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलचे उपक्रमशील मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत यांची निवड झाली आहे.
शालेय नेतृत्वाशी संबंधित ज्ञान आणि प्रक्रियांची आंतरराज्य व राज्यात देवाण-घेवाण करण्यासाठी सशक्त नेटवर्क तयार करण्यासाठी शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत NCSL निपा,नवी दिल्ली यांच्या सूचनानुसार मिपा- SLA संस्थेमार्फत सन 2019 ते 2025 या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने Inter State of Practices या उपक्रमानुसार A Regional Seminar On School Leadership Development या तीन दिवसांनी दिवसीय निवासी राज्यस्तरीय चर्चासत्र दिनांक 2 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत पेस सेंटर, नांद्राबाद, तालुका- खुलताबाद, जिल्हा – छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान,गोवा, दिवदमन, दादरा नगरहवेली या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्याध्यापक व अधिकारी सहभागी होऊन शैक्षणिक संशोधन केंद्रित शोधनिबंध तसेच शाळेच्या उत्कृष्ट कामाचे सादरीकरण करण्याची संधी यातून प्राप्त होणार आहे. ज्यातून महाराष्ट्रातील शालेय नेतृत्वाचे उत्तम कार्य महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर येईल. इतर राज्यात नावलौकिकास पात्र होईल, त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील उत्कृष्ट शैक्षणिक काम करणाऱ्या हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत यांची निवड करण्यात आली आहे. प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेले नवोउपक्रम, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेला बहुविध कौशल्य विकास अभ्यासक्रम,भौतिक सुविधा साठी लोकसहभागातून घेतलेले सहकार्य, विद्यार्थी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ करून देणे तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त शाळा असल्याने शालेय नेतृत्व विकास अंतर्गत श्री.म्हाडगुत यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. संस्था अध्यक्ष उदय सावंत, सेक्रेटरी दीपक नारकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत नाईक,उपाध्यक्ष गुरुदास कुसगावकर,खजिनदार बाजीराव झेंडे, सहसेक्रेटरी पंढरीनाथ सावंत संचालक नागेश आईर,योगेश परब,नरेंद्र राणे,चंद्रकांत सावंत,रवींद्र देसाई,प्रकाश सावंत व इतर सर्व संचालकांनी तसेच सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एकनाथ सरनोबत,कुडाळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अजित परब, त्याचबरोबर पंचकोशीतील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.









