ठळक घडामोडी

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला तेंडोली महोत्सव !

शोभायात्रा ठरली लक्षवेधी; विविध स्पर्धांचे आयोजन

महोत्सवातून तेंडोली गावाची ओळख अधिक दृढ होईल – सभापती मिलिंद नाईक

कुडाळ : प्रतिनिधी
       तेंडोली हे निसर्गसंपन्न व कलावंतांचे गाव असून, तेडोली महोत्सव २०२६ मधून गावाची ओळख अधिक दृढ होईल, असा विश्वास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांनी व्यक्त केला. या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली.
    कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तेंडोली गावात “तेंडोली महोत्सव 2026” आयोजित करण्यात आला. श्री देव रवळनाथ पंचायतनच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जि.प. सदस्या आरती पाटील, उद्योजक प्रसाद नाईक, राजू राऊळ, राजन नाईक, पं. स. सदस्य मंगेश उर्फ भाऊ प्रभू, पं. स. सदस्या प्रियांका जळवी, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, सरपंच अनघा तेंडोलकर, आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर, ग्रा. पं. सदस्या उत्कर्षा प्रभू, माजी पं. स. सदस्या माधवी प्रभू, शिंदे शिवसेना तेंडोली विभाग प्रमुख रामचंद्र राऊळ, चेअरमन संजय प्रभू, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद राऊळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अरुण राऊळ, खर्डेकर कॉलेज (वेंगुर्ले) चे निवृत्त प्राचार्य प्रदीप होडावडेकर, सहदेव धर्णे, प्रसाद सातार्डेकर, विष्णू तेंडोलकर, सत्यवान तेंडोलकर आदी उपस्थित होते. यावेळी मिलिंद नाईक यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
     प्रफुल्ल वालावलकर यांनी गावाच्या निसर्ग व कृषी वैभवाचे कौतुक करत सांस्कृतिक जतनासाठी प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. आरती पाटील यांनी अशा उपक्रमांमुळे गावात एकोपा वाढतो, असे नमूद केले. संजय वेंगुर्लेकर यांनी परंपरा व संस्कृती जपण्याचे महत्त्व सांगितले, तर सरपंच अनघा तेंडोलकर यांनी महोत्सवातून महिला व युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश स्पष्ट केला.या महोत्सवात शोभायात्रा, वेशभूषा स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, रांगोळी, खेळ पैठणी, एकपात्री अभिनय स्पर्धा तसेच आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंगेश प्रभू यांनी केले. सूत्रसंचालन राधाकृष्ण परब यांनी तर आभार विष्णू तेंडोलकर यांनी मानले.

error: Content is protected !!