ठळक घडामोडी

कुडाळ येथे आजपासून रोटरी महोत्सवाची धूम!

आमदार निलेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची उपस्थिती

२९, ३० व ३१ डिसेंबर या कालावधीत फेस्टिव्हलचे आयोजन; भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल

कुडाळ : प्रतिनिधी
         रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी इंडस्ट्रियल, फूड अॅण्ड ऑटो एक्स्पो फेस्टिव्हल २०२५ दि. २९, ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायं.७ ते रात्री १० या वेळेत कुडाळ हायस्कूल मैदानावर होतआहे.  सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आमदार निलेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहीती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार यांनी दिली.
        या उद्घाटन समारंभास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे माजी गव्हर्नर संग्राम पाटील, सारस्वत बँकेचे संचालक अनिल आंबेसकर, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते व विनया बाड, प्रसिद्ध संगीतकार विजय गवंडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
     फेस्टिव्हलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य, संगीत, विनोदाचे कार्यक्रम, ऑटो एक्स्पो, लहान मुलांसाठी विविध मनोरंजनाचे प्रकार ठेवण्यात आले आहेत. विविध खाद्यपदार्थांच्या मेजवानीसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम निखिल मधाळे, झी युवा सिंगर फेम ब्रह्मनंदा पाटणकर, हर्षद मेस्त्री यांचे सादरीकरण तसेच चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमीचा ग्रुप डान्स होणार आहे. जिल्हावासियांना या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ कुडाळतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!