समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रंगणार ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रम
‘माझा अणाव’ सेल्फी पॉईंटसह सेलिब्रिटींची धमाकेदार उपस्थिती
कुडाळ : प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत अणावच्या वतीने “सेलिब्रिटी भेट कार्यक्रम” रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर, अणाव (ता.कुडाळ) येथे आयोजित करण्यात आला आहे. या विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर हे सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून “माझा अणाव” सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच लीलाधर अणावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर यांच्यासह समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामस्तरीय समितीने केले आहे.









